शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती – Shivneri Fort Full Information

3
शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती - Shivneri Fort Full Information

शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती – शिवनेरी हा महाराष्ट् राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर ह्या शहरात आहे.हा किल्ला नाणेघाटाच्या डोंगररांगां मध्ये वसलेले असल्याचे आपणास दिसून येते.शिवनेरी हा किल्ला पुणे शहरापासून साधारणतः सुमारे १०५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

भारत सरकारच्या वतीने शिवनेरी ह्या किल्ल्यास २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक ह्या बहुमानाने घोषित देखील करण्यात आले आहे.शिवनेरी हा किल्ला समुद्र सपाटीपासुन सुमारे ३ हजार ६०० फुट इतक्या उंचीवर स्थित आहे.जुन्नर मध्ये शिरतानाच आपणास ह्या किल्ल्याचे दर्शन होते.शिवनेरी हा एक गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.हया किल्ल्याची चढाईची श्रेणी ही मध्यम स्वरुपाची आहे

शिवनेरी किल्ल्याची स्थापणा इसवी सन ११७० मध्ये करण्यात आली होती.हया किल्ल्याचा आकार भगवान शंकराच्या पिंडीसारखा आहे.सातवाहन काळानंतर शिवनेरी हा किल्ला चालुक्य आणि राष्ट्रकूट या दोन्ही सत्तांच्या राजवटीत होता.११७० ते १३०८ मध्ये शिवनेरी ह्या किल्ल्यावर यादवाननी त्यांचे राज्य स्थापित केले होते.याच काळात शिवनेरीस गडाचे स्वरूप प्राप्त झाले.शिवनेरी हा किल्ला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी आहे.ह्याच किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता.हेच कारण आहे की ह्या शिवनेरी किल्ल्याला आज एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.

शिवनेरी ह्या किल्ल्याच्या चहुबाजुला एक कठिण चठन आहे त्यामुळे हा किल्ला जिंकून घेणे अत्यंत अवघड गोष्ट मानली जाते.शिवनेरी ह्या किल्ल्यावर आपणास बाल शिवाजी अणि राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा पाहावयास मिळते.तसेच ह्या किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर देखील स्थापित करण्यात आले आहे.शिवनेरी ह्या किल्ल्याला एकूण सात दरवाजे असल्याचे आपणास दिसून येते.तसेच गडावरील लोकांचे संरक्षण करण्यासाठी किल्ल्याच्या भोवती भक्कम तटबंदी देखील बांधण्यात आली आहे.शिवनेरी किल्ल्याच्या मध्यभागी गोड्या पाण्याचे सरोवर देखील बांधण्यात आले आहे.हया सरोवरास बदामी तलाव असे नाव देण्यात आले आहे.शिवनेरी ह्या किल्ल्यावर दोन पाण्याचे झरे देखील बांधण्यात आले आहेत.हया दोघे झर्यांना गंगा अणि यमुना असे संबोधित केले जाते.ह्या दोघे झरयांना वर्षभर पाणी येत राहते.

शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती – Shivneri Fort Full Information 

शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती - Shivneri Fort Full Information

पुर्वीच्या काळी धान्य साठविण्यासाठी जो काही अंबारखाना वापरला जात असे तो देखील ह्या शिवनेरी गडावर आहे.शिवनेरी गडावर स्थापण करण्यात आलेल्या शिवाई देवीच्या मंदिराच्या नावावरून शिवाजी महाराज यांचे नामकरण शिवाजी असे करण्यात आले होते.शिवनेरी ह्या किल्ल्यावर असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मघर,महादरवाजा,कडेलोट टोक,पाण्याचे झरे बालेकिल्ला इत्यादी अनेक गोष्टी इथे पाहण्यासारख्या आहेत.शिवनेरी किल्ल्यावर चढण्यासाठी सुमारे ४५० पायरी आहेत.

शिवनेरी किल्ला चढायला आपणास साधारणतः ३० मिनिटे इतका कालावधी लागतो.ह्या किल्ल्याचे सुभेदार शिवरायांचे आजोबा मालोजी भोसले होते.शिवनेरी ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटकांना कुठल्याही प्रकारचे शुल्क भरण्याची आवश्यकता नसते कारण ह्या किल्याला भेट देण्यासाठी पर्यटकांकडून एक रूपया देखील आकारला जात नाही.तसे पाहायला गेले तर शिवनेरी ह्या किल्ल्याला पर्यटकांना कधीही भेट देता येते.पण शिवनेरी ह्या किल्ल्यावर भेट देण्यासाठी आॅक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान पर्यटकांची प्रचंड गर्दी आपणास पाहावयास मिळते.

१६७३ साली ईस्ट इंडिया कंपनीच्या जाॅन फ्रायर यांनी शिवनेरी ह्या किल्ल्याला प्रत्यक्ष भेट दिली होती ज्यात त्यांना ह्या किल्ल्यावर जी काही शिधासामुग्री दिसुन आली त्यावर भाष्य करताना त्यांच्या एका साधन संग्रहात ते म्हणाले की शिवनेरी ह्या किल्ल्यावर हजारो परिवारांना पुरेल इतकी अमर्याद शिधासामुग्री उपलब्ध आहे.१६३२ ह्या सालात राजमाता जिजाऊ यांनी शिवराय फक्त दोन वर्षांचे असताना हा गड सोडला यानंतर १६३७ मध्ये शिवनेरी ह्या किल्ल्यावर मोगलांनी ताबा मिळवला.१६५० मध्ये महादेव कोळींनी मोगलांविरूदध बंड पुकारत किल्ल्यावर हल्ला केला पण ह्या लढाईत मोगलांना विजय प्राप्त करण्यात यश प्राप्त झाले.

१५१६ साली शाहु महाराज यांनी शिवनेरी हा किल्ला मराठेशाही मध्ये आणण्यात यश प्राप्त केले.पुढे हा किल्ला पेशव्यांना हस्तांतरित करण्यात आला. शिवनेरी गडावर जाण्यासाठी एकुण दोन वाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्या दोघेही वाटा जुन्नर ह्या गावातुन जाता.जे व्यक्ती पुणे मुंबई मधील रहिवासी आहेत ते एका दिवसात शिवनेरी किल्ल्याला भेट देऊन घरी परतु शकतात.साखळीच्या वाटेने गडावर यायचे झाल्यास आपणास जवळपास एक तास लागतो अणि सात दरवाज्याच्या वाटेने गडावर यायचे म्हटले तर आपणास दोन तास इतका कालावधी लागेल.

शिवनेरी किल्ल्याचा इतिहास – शिवनेरी किल्ल्याचा इतिहास

Shivneri Fort - Forts of Maharashtra

पुणे जिल्ह्यावर सर्वप्रथम शिवनेरी चालुक्य आणि राष्ट्रकूट यांनी आपले राज्य स्थापित केले होते.११७० ते १३०८ दरम्यान यादवांनी देखील येथे आपले राज्य केले.यानंतर १४४३ मध्ये मालकांनी यादवांना पराभुत केले अणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.मग दिल्लीची सुलतानशाही कमजोर झाली अणि सोळाव्या शतकाच्या दरम्यान हा किल्ला अहमदनगर येथील सुलतानाला दिला गेला.यानंतर अहमदनगरच्या सुलतानाने हा  शिवनेरी किल्ला मालोजी भोसले यांना भेट म्हणून दिला.मालोजी भोसले हे शिवाजी भोसले यांचे आजोबा होते.

मग १६३० मध्ये १९ फेब्रुवारी रोजी हयाच शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला.छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपुर्ण बालपण ह्याच किल्ल्यावर गेले.दहा वर्षांचे होईपर्यंत शिवराय ह्याच किल्ल्यावर वास्तव्यास होते.यानंतर १६७३ साली एका इंग्रज पर्यटकाने ह्या किल्ल्याला भेट दिली आणि त्यानंतर त्याने ह्या शिवनेरी किल्ल्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.पुढे १८२० मध्ये इंग्रज अणि मराठा यांच्यात युद्ध झाले त्यानंतर हा किल्ला ब्रिटीश सत्तेच्या ताब्यात गेला होता.

शिवनेरी गडावर पाहण्यासारखी कोणकोणती ठिकाणे आहेत?

शिवनेरी गडावर पाहण्यासारखी अनेक महत्वाची ठिकाणे आहेत. Shivneri Fort

इथे बदामी पाण्याचा तलाव आहे, कडेलोट बुरूज,शिवाई मंदिर,कमानी मशीद,गंगा जमुना पाण्याची टाकी, अंबरखाना, हमामखाना, शिवरायांच्या जन्म स्थळाची इमारत,बाल शिवाजी अणि राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा महादरवाजा बाले किल्ला इत्यादी अशी अनेक पाहण्यासारखी ठिकाणे इथे आहेत.

Also Read –

हरीहऱ किल्ला संपूर्ण माहिती | Harihar Fort Information | Harihar Fort Trek – Best Trek

Read More :

Raigad Fort Full Information – रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती | मराठा साम्राज्याची भव्य राजधानी

3 thoughts on “शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती – Shivneri Fort Full Information

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *